माझ्या बालमित्रांनो,
अभ्यास करा, पेपर सोडवा, पाठ्यपुस्तके वाचा, असे सारखे आपण आपल्या शिक्षकांकडून तसेच आई-बाबांकडून ऐकत असतो....नाही का ? परीक्षा संपली तरी गृहपाठ व सुट्टीचा अभ्यास मागे लागतोच कि नाही ? हे सर्व करून देखील तुम्हाला खेळायला मिळावे, कार्टून्स वाचायला आणि बघायला मिळावे असे सारखे वाटते नं ?
मित्रांनो, मग घ्या आपल्यासाठी एक जादूची छडी. माईड मैप म्हणजेच मनाचा नकाशा.
तुम्ही विचारलं माईड मैप म्हणजे काय आणि त्याने आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे कशी सुटतील ?
चला तर मग आपण जाणून घेउया या जादूच्या छडीला.
माईड मैप हा मेंदू प्रमाणेच काम करतो कसे टे पाहा.
उदा. तुम्हाला जर मी विचारले कि मागच्या सुट्टीत तुम्ही मामाच्या गावाला जाऊन काय काय मजा केली. आठवा आणि सांगा पाहू ; तर तुम्ही फक्त एक ते दोन सेकंद डोळे मिटले कि तुम्हाला काय दिसत ?
मनातल्या मनात तुम्हाला वेगवेगळे प्रसंग चित्र व चलचित्र अस दिसत कि नाही ? हाच माईड मैप.
मनातल्या मनात चित्र चलचित्र पाहणे (IMAGINATION) व त्यांना एकमेकांना जोडून (ASSOCIATION) एकत्रित करणे म्हणजे मनाचा नकाशा (MIND MAP).
मित्रांनो हे तुम्ही अजाणतेपणी दररोज अनेक वेळा करात असतो. म्हणून तुम्हाला मनाचा नकाशा अगदी पटकन जमू शकेल. करण आपला मेंदू व माईड मैप एकाच तत्वावर काम करतात (IMAGINATION) व (ASSOCIATION)
मनाच्या माकाशाने काय काय फायदे मिळतील आपण आता पाहू या :-
1) एक तासाच्या अभ्यासाचे केवळ 5 ते 10 मिनिटात अवलोकन
2) एक धडा केवळ 2 ते 3 मिनिटांमध्ये समजतो.
3) त्या धड्याची उजळणी 1 ते 2 मिनिटात होते.
4) संपूर्ण पुस्तक 1 ते 2 तासांच्या वाचनात लक्षात ठेवता येते.
5) परीक्षेच्या वेळी उजळणी करणे अतिशय सोपे जाते.
6) माईड मैप वरून एखाद्या शिक्षकासारखे वर्गाला शिकवता येते.
आमच्या छत्रपती शिक्षण संस्थेच्या रातवड माध्यमिक शाळेच्या इयत्ता 8 व 9 च्या विध्यार्थानीनी वरील सर्व फायदे स्वतः अनुभवले आहेत बर का :
8 वीच्या दोन विध्यार्थानीनी तर शिक्षक वर्गात नसतांना सर्व पाठ इतर विध्यार्थ्यांना समजावून दाखवला. यातील बऱ्याच गोष्टी आम्ही YOUTUBE वर पण ठेवल्या आहेत.
आपण आता मनाच्या नकाशा कसा बनवता येतो टे पाहू या.
* मनाचा नकाशा (MIND MAP) हा एका कागदावर, संगणकावर, भ्रमणध्वनीवर (MOBILE PHONE) किंवा इंटरनेटवर देखील बनवता येतो.
* आपण सुरुवात मात्र कागद पासून करू या. सर्व प्रथम एक फुलस्केप आकाराचा कोरा कागद द्या आपल्याजवळ किमान 4-5 रंगाच्या पेन्सिल / पेन असू द्या.
* जी संकल्पना मांडायची आहे किंवा जे अभ्यासाचा विषय आहे. तो कागदाच्या मध्यभागी लिहा व त्याला एका वर्तुळाने गिरवा. आता त्या विषयासाठीचे महत्वाचे मुद्दे एका शब्दात लिहून त्यावर वर्तुळ किंवा चौकोन काढा व ते मुद्दे मध्यवर्ती संकल्पनेला जोडा. आता अशी कल्पना करा कि मुख्य संकल्पना म्हणजे झाडाचे खोड व त्यापासून मुद्दे म्हणजे मोठया फांद्या व उपमूद्दे तसेच उपउपमूद्दे म्हणजे छोट्या फांद्या. असा पसारा म्हणजे झाला मनाचा नकाशा तयार (आकृती पहा)
* यात प्रत्येक फांदीला वेगवेगळे रंग द्या. तसेच एकापेक्षा जास्त शब्द वापरू नका. यात वेगवेगळी चित्रे, आकार तसेच क्रमांक तुम्ही वापरू शकता. आता इतकेच पुरे. जास्तीची माहिती तुम्ही You Tube वरून पण घेऊ शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही मला [email protected] या ईमेलवर विचारू शकता.
आपल्याला शुभेछ्या.
धनंजय पाठक