Chhatrapati Shikshan Mandal

मुंबई राज्याचे १ मे १९६० रोजी विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात हि राज्य अस्तित्वात आली. या काळात राजकीय लढा व चळवळ यावरच सर्व लक्ष केंद्रित झाले होते. कल्याणमध्येही या आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांच्या डोळ्यासमोर अशिक्षित समाज होता. म्हणून ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, त्याच दिवशी त्याच मुहूर्तावर म्हणजे १ मे १९६० रोजी छत्रपती शिक्षण मंडळ स्थापन झाले व जून १९६० मध्ये पहिली शाळा अभिनव विद्यामंदिर सुरु झाली. इ ५ वी ते ८ वी मध्ये एकूण १३८ विध्यार्थ्यानी प्रवेश घेतला. कल्याणमधील ज्या विध्यार्थ्यानी प्रस्थापित शाळा प्रवेश देण्यास फारशा उत्सुक नसत , असे विद्यार्थी प्रविष्ट झाले.

अभिनव विद्यामंदिर भाड्याच्या जागेतून स्वतःच्या वस्तुत प्रवेश करीत असतानाच १९६१ च्या जून मध्ये नूतन विद्यालय मुरबाड रोडला सुरु झाले. त्यानंतर पुढील वर्षी १९६२ मध्ये कल्याण पूर्व मध्ये म्हणजे कोळसेवाडीत ज्ञान मंदिर व मांडा – टीटवाळा येथे विद्यामंदिर सुरु झाले. १९६३ मध्ये मुरबाड तालुक्यात धसई येथे जनता विद्यालयात प्रारंभ झाला. तर १९६४ मध्ये विक्रमगड हायस्कूलच्या संचालनाची जबाबदारी छत्रपती शिक्षण मंडळाने स्वीकारले. संस्थेचे ब्रिद मागेल त्याला शिक्षण असे असलेल्यांची संस्थेने जेथे जेथे शिक्षणाची गरज होती. तेथे तेथे पाऊल टाकून शिक्षणापासून वंचित असलेल्यांची शैक्षणिक गरज पूर्ण करण्याच्या प्रयत्नास लागली. पहिल्या चारच वर्षात संस्थेने ६ माध्यमिक विद्यालये विविध भागात सुरु केली. शिक्षणापासून दूर असलेल्या समाजातील मुले आपल्या शाळांमुळे शैक्षणिक प्रवाहात आली. त्याकाळी माध्यमिक शिक्षणाची सोय सर्वत्र नव्हती .

विक्रमगड हायस्कूल हे दुर्गम व वनवासी भागात असल्याने तेथील वनवासी , आदीवासी विद्यार्थ्याच्या आयुष्यात शैक्षणिक पाहत उगवली. संस्थेने आपल्या ब्रीदाला साजसे कार्य पहिल्या चार वर्षातच सुरु केले. शहरातील उपेक्षित वस्त्या, ग्रामीण भाग , दुर्गम भाग , वनवासी भाग या सर्व ठिकाणी संस्थेने माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था शाळांमार्फत उभी केली. प्रत्येक ठिकाणचे प्रश्न भिन्न होते. ग्रामीण , दुर्गम , वनवासी भागात गरीबी , अशिक्षितपणा , व्यसनाधीनता या गोष्टी होत्या , परंतु शिक्षणाचे महत्वही समाजाला फारसे पटलेले नव्हते. शिकलेली मुले शेती काम करीत नाहीत , म्हणून शेतकरीवर्ग आपली मुले शाळांमध्ये पाठविण्यास उत्सुक नव्हता . शहरी भागात पालकांचा नोकरी किंवा हातावरील धंदा अल्प उत्पन्न व व्यसनाधीनता यामुळे मुले शिकलीच पाहिजे असा आग्रह त्यांचा नसे . या सर्व कारणांमुळे शाळेत आलेली मुले शिक्षण अर्धवट सोडत. अशा सर्व अडचणीवर मात करीत शाळा वाटचाल करीत होत्या. शाळांमध्ये विद्यार्थ्याबरोबर शिक्षक वर्ग टिकवून ठेवण्यास मोठे आव्हान संस्थेसमोर होते .

शाळेतील शिक्षकांना वेतन अतिशय तुटपुंजे होते. भविष्य विर्वाह निधी , पेन्शन इ. सोयी नव्हता. तसेच शिक्षकांना सेवा शाश्वती नव्हती . यामुळे शिक्षक पेशाकडे तरुणवर्ग येऊ इच्छित नव्हता. संस्थेने प्रयत्नपूर्वक महाविद्यालयीन विद्यार्थी , पदवीधर तरुण अशांना विश्वास देऊन शैक्षणिक क्षेत्रात आणले. त्यांच्या आर्थिक अडी अडचणी सोडविल्या. अनेकांना शिक्षण पूर्व करण्यासाठी सहाय्य केले. ग्रामीण दुर्गम भागत शिक्षक पाठविणे , त्यांना तेथे बसविणे यामध्ये देखील संस्थेला लक्ष घालावे लागले .

या सर्व प्रतात्नांना यश येऊन १९६४ पासून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले म्हणजे s.s.c. झालेले विद्यार्थी आपल्या शाळांमधून बाहेर पडू लागले. ग्रामीण भागातील विद्यार्थी शेतीस मदत , पालकांना मदत करण्यापासून , जत्रेत छोटा मोठा विक्री व्यवसाय करावयाचे. तर शहरातील विद्यार्थी पालकांच्या व्यवसायात मदत करत असत. विद्यार्थ्याने शाळेत जाणे , शिकणे हे साधारतःपणे विद्यार्थ्याच्या इच्छेवरच अवलंबून असावयाचे . अशा विद्यार्थ्याकडून अभ्यास करवून घेणे. त्यांना s.s.c. पर्यंत शाळेमध्ये टिकविणे व परीक्षेत उत्तीर्ण व्हावेत , म्हणून शिक्षकांनी प्रयात्नाची पराकाष्ठा करावी लागत असे.

शाळेतील विद्यार्थी शालेय विशायांखरेजी चित्रकला परीक्षा देत. या सर्व विद्यार्थ्याचा खेळण्याकडे अधिक कल असल्यान कबड्डी खो-खो या सारख्या खेळ्याच्या स्पर्धेत यश मिळवीत असत. संस्थेने सुरुवातीपासून शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित व्हावे , म्हणून सांस्कृतिक , संस्कारयुक्त कार्यक्रम शाळांमधून लेखक , कवी , सामाजिक कार्यकर्ते यांची व्याख्याने. व्याख्यानमाला तसेच क्रीडा क्षेत्रात यश कसे मिळवावे , याचे मार्गदर्शन करण्यासाठी नामवंत क्रीडापटूना शाळेत निमंत्रित करून , त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत असे. विद्यार्थी भावी आयुष्यात आपल्या पायावर उभ रहावा , म्हणून व्यावसायिक शिक्षण टंकलेखन टेक्निकल शिक्षण इ. उपक्रम सुरु केले.

सामाजिक दृष्टीकोन ठेऊन शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारी आपली संस्था असल्याने शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यावर संस्थेच्या भर होता. छत्रपती शिक्षण मंडळाने ज्या शाळा सुरु केल्या . त्या शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी होत्या. सहाजिकच सुरुवातीच्या काळात शाळेत येणारे विद्यार्थी अन्य शाळांनी नाकारलेले प्रस्थापित शाळांमधून नापास झालेले , काही कारणांनी शाळांमधून काढून टाकलेले विद्यार्थी आपल्या शाळेत येत. अशा विद्यार्थ्यांना योग्य रस्त्यावर आणण्याचे काम छत्रपती शिक्षण मंडळाने केले.

१९७५ पासून १००% प्रशिक्षित शिक्षक असलेल्या शाळा निर्माण झाल्या . याच काळात संस्थेनी डोंबिवलीला श्री . रा. साठे कन्या शाळा , ठाण्यात मो. कृ नाखवा हायस्कूल , मुरबाड तालुक्यात नारीवरील येथे सह्याद्री विद्यालय , तर सायले तेथे सरस्वती विद्यालय सुरु केले . तसेच पडघे येथील शारदा विद्यालय संस्थेकडे आले. शिक्षणाचा प्रसार , प्रचार व विद्यार्थ्यावर संस्कार करण्याचे कार्य करताना संस्थेच्या शाळा दिसून येतात . कोणताही पूर्वानुभव नसताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या काळात सुरु केलेल्या माध्यमिक शाळा हे संस्थेच्या आत्मविश्वास वाढविणारे व समाजाचा विश्वास संपादन करणारे कार्य ठरले . साधरणपणे १९७५ ते १९९० या काळात संस्थेच्या शाळांचा भौतिक व शैक्षणिक विकास व्हावयास सुरुवात झाली.
मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळा स्थिर होत असतानांच १९९० नंतर समाजामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचे आकर्षण निर्माता झाले. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळा सुरु झाल्याचा परिणाम काही शाळांवर होऊ लागला. ठाण्यात नाखवा हायस्कुलवर प्रथम परिणाम झाला. विद्यार्थी संख्या व तुकडयांची संख्या कमी होणे , अशा प्रकारचा धक्कादायक अनुभव संस्थेस आला. याच काळात ग्रामीण व वनवासी भागात माध्यमिक शाळांबरोबरच कनिष्ठ

महाविद्यालये संस्थेच्या सुरु करण्याबाबत स्थानिक कार्यकर्त्याकडून संस्थ्येस आग्रह धरण्यात आला. संस्थेने पहिले कनिष्ठ महाविद्यालय विक्रमगड येथे व त्यानंतर धसईयेथे सुरु केले. दोन्ही ठिकाणच्या ग्रामीण व वनवासी विद्यार्थ्याची १२ वी पर्यंत शिक्षणाची सोय स्थानिक पातळीवर झाल्याचा फायदा मुलींचे शिक्षण १२ वी पर्यंत होण्यात झाला. डोंबिवली कन्याशाळेचे स्वरूप बदलून सह शैक्षणिक म्हणजे मुले व मुली शिक्षण घेणाऱ्या शाळेत करण्यात आले .

संस्थेच्या वाटचालीतील महत्वाचा टप्पा म्हणजे रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागात म्हणजे उसर, वाघेरी वडघर व रातवड या ठिकाणी संस्थेने माध्यमिक शाळा मार्फत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. रायगड जिल्ह्यातील दुर्लक्षीत लहान लहान गावात माध्यमिक शाळा निर्माण झाल्याने या भागातील नवी पिढी सुशिक्षित झाली. सुरुवातीला कच्च्या बांधकामाच्या खोल्यांमध्ये भरणाऱ्या शाळा संस्थेच्या प्रयत्नाने आज सुसज्ज इमारतींमध्ये भरत आहेत. रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात छत्रपती शिक्षण मंडळाने आदराचे स्थान प्राप्त केले आहे. या सर्व शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक सामाजिक बांधिलकीतून वनराई बंधारे, ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबीरे, नेत्र चिकित्सा शिबीर व मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करतात. शालेय शिक्षणाबरोबरच सामाजिक दायीत्वाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये उत्पन्न होण्यास , या उपक्रमांची मदत होते. या शाळांची शैक्षणिक प्रगती संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

ठाणे जिल्ह्यातील दुर्लक्षीत असलेल्या वनवासी , आदिवासी भागात डेंगाचीमेट , तलासरी , सूत्रकार व मेढा या ठिकाणी माध्यमिक शाळा चालू केल्या . या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा देणे , विद्यार्थ्यांना विशेषतः १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी निवासी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे व वनवासी विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती व्हावी , म्हणून संस्था विशेष लक्ष देत असते.

विक्रमगडच्या कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी संख्या वाढ तर होताच आहे. परंतु संस्थेने कला वाणिज्य व विज्ञान शाखा सुरु केल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक शाखांची दालने उघडली आहेत. विद्यार्थी तीनही प्रकारच्या शाखांचे १२ वी पर्यंत शिक्षण घेऊन पुढे आपल्या आवडीच्या शाखेत पदवी पर्यंत किंवा त्यापेक्षाही अधिक शिक्षण घेऊ शकतात .

संस्थेनी एकाच वेळेस वनवासी भागात व रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागात माध्यमिक शाळा सुरू केल्या. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यात सुनियोजित विकसीत होणाÚया नवी मुंबईत सानपाडा येथे विवेकानंद संकुलात इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळा १९९५ मध्ये सुरू केल्या. सिडकोने बांधून दिलेल्या व शाळेला मैदान असलेल्या इमारतीत सिडकोच्या अटीनुसार इंग्रजी व मराठी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांना प्रारंभ झाला. परिसरात एक प्रतिष्ठित शाळा म्हणून विवेकानंद संकुल गणले जाऊ लागले. आज त्या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयही विकसीत होत आहे.

संस्थेच्या वाटचालीतील पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे पडघे येथे महाविद्यालय म्हणजे सिनिअर कॉलेज उघडण्यात संस्थेला यश आले. आज पडघे येथे कला व वाणिज्य शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय व सिनिअर कॉलेजचा लाभ ५०० विद्यार्थी घेत आहेत.

भिवंडी तालुक्यात नांदकर सांगे येथे ८ वी ते १० वी पर्यंत वर्ग असलेले माध्यमिक विद्यालय व अन्य ठिकाणी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणाची सोय करण्यात संस्थेने पुढाकार घेतला. याच काळात कल्याणमध्ये १९३२ पासून स्त्री शिक्षण मंडळाची प्रथम गर्लस् स्कूल व नंतर नवजीवन विद्यामंदिर सह शिक्षण देणारी माध्यमिक शाळा व शिशुरंजन प्राथमिक शाळा संस्थेमध्ये सामील झाली व तेथील संख्यात्मक व गुणात्मक प्रगतीत वाढ होतांना दिसून येते. ठाणे व रायगड जिल्ह्यात संस्था पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंत शिक्षण देणारे महाविद्यालये यशस्वीपणे संचालित करीत आहे.

मार्च २०००३ मध्ये नूतन विद्यालय, कल्याण या शाळेतील कु. किरण चव्हाण हा शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत १८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. आज तो नौदलात दाखल झाला असून, देश संरक्षणामध्ये योगदान देत आहे. अशाच प्रकारचे यश ज्ञानमंदिर हायस्कूल कल्याण पूर्व मधील कु. ज्योत्स्ना भट या विद्यार्थीनीने शालांत परीक्षेत मागासवर्गीय यादीत ४ थ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन मिळविले. नवी मुंबई सानपाडा येथील विवेकानंद संकुलातील मराठी माध्यमात शिकणाऱ्या
कु. प्रियंका भोवर या विद्यार्थीनीने मार्च २००७ मध्ये s.s.c. बोर्डाच्या गुणवत्ता यादीत ७ व्या क्रमांकाने व नव्या मुंबईत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शाळेला अभिमानास्पद यश मिळवून दिले.

संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात सुरूवातीपासून आघाडीवर आहेत. कबड्डी व खो-खो यासारख्या सांघिक खेळात शाळांनी यश मिळविले आहे. ज्ञानमंदिर हायस्कूलचा नारायण शिंगरे हा कबड्डीमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार व आशियाई कबड्डी स्पर्धेत खेळाडू म्हणून खेळला आहे. मो. कृ. नाखवा हायस्कूलचा माजी विद्यार्थी सुलक्षण कुलकर्णी भारतीय क्रिकेट संघात यष्टिरक्षक म्हणून १९८६ ते १९८८ या काळात वेस्टइंडिज, पाकिस्तान व इंग्लंड येथील सामन्यात सहभागी झाला होता.

सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक शारीरिक भावनात्मक विकास विविध उपक्रमातून होत असतो. अशा कार्यक्रमाचे आयोजन शाळांनी करावे, असा संस्थेचा दृष्टीकोन असतो. लहान शाळेतील २०० विद्यार्थ्यांच्या संख्येपासून १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमधून शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाषोध परीक्षा (N.T.C), महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा (M.T.C) होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा, चित्रकला परीक्षा अषा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थी बसतात. यामुळे संस्थेच्या शाळा शैक्षणिक क्षेत्रात प्रगती पथावर आहेत. क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्याचे यश आनंददायी आहे. संस्थेने मागील अर्ध शतकात सामाजिक दृष्टिकोन ठेऊन शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. त्याचप्रमाणे मागील काही वर्षात संस्थेच्या शाळांमध्ये गुणत्मक बदल होऊन अनेक शाळांनी उत्कृष्ट शैक्षणिक यश मिळविण्याचे दिसून यते. संस्थेची सुरूवात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाली अनेक अडी-अडचणींवर संस्थेने शिक्षकांच्या मदतीने मात करून शहरातील वंचित, ग्रामीण व वनवासी भागातील शिक्षणापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे शिवधनुष्य उचलण्यात संस्था यशस्वी झाली. या प्रवासात अनेक शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभागही खूप मोठा होता.