कै. रामचंद्र काशिनाथ म्हाळगी

रामभाऊ म्हाळगी या नावाने लोकप्रिय. एक आदर्श संसदपट्टू. पक्षाच्या लोकप्रतिनिधीने आपली जबाबदारी कशी पार पाडावी याचे जे मोजके आदर्श आहेत त्यात कै . रामभाऊ चे नाव अग्रणी. ०९ जुलै १९२१ चा जन्म, १९३९ मध्ये मॅट्रिक परीक्षेत प्रथम श्रेणीत उतीर्ण . या शालेय काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला व पुढील काळात संघाचे दोन वर्षाचे शिक्षण पूर्ण केले व पुढील महाविध्यालयीन शिक्षण पुण्यातून न घेता संघाचे प्रचारक बनून केरळ मध्ये कार्यरत झाले. काही काळ तेथे काम केल्यावर पदवीधर होण्यासाठी पुण्यात परत आले व १९४५ मध्ये बी. ए. ची पदवी संपन्न केली. संघटनकुशलता असल्याने व डॉ . हेडगेवार यांच्या निधनानंतर संघकामाची वाढवण्यासाठी पूजनीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रचारक म्हणून सोलापूर जिल्ह्यात कार्यरत झाले . प्रचंड मेहनत जिल्हा पिंजून काढत संघकामाचे जाळे उभे केले

१९४८ च्या संघबंदी उठावयाण्यासाठी अन्यायाविरुद्ध आन्दोलन केले. संघबंदी उठल्यावर प्रचारक म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला. पुण्याला परतल्यावर पदव्यूत्तर शिक्षण घेत एम.ए. व एल. एल. बी. पूर्ण केले. काही काळ अर्थाजन करत १९५१ मध्ये बार कौन्सिल परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वकिली व्यवसाय करण्याचा निर्धार केला व कौटुंबिक स्वावलंबन राखायचे ठरवले . सांगकामाची ओढ होतीच , काही काळ अखिल भारतीय विधार्थी परिषदेची जबाबदारी घेत असतानाच राजकीय कामाची अनिच्छेनी भारतीय जनसंघाची महाराष्ट्र प्रांताची कर्यवाह म्हणून जबाबदारी स्वीकारली

१९५२ पासून पक्षाचे काम करताना संघटनकुशलता व कल्पकता याचा अप्रतिम मेळ साधून विविध आघाड्या स्थापून संपर्क वाढवून , आंदोलन चालवली , जनजागृती करत प्रभाव वाढवला . याच कळत १९५५ जून मध्ये विवाहबद्ध झाले . कौटुंबिक , व्यवसायिक , राजकीय जबाबदाऱ्या सांभाळत शिस्तबद्ध आयुष्याची आखणी केली. व जीवनात कधीही तोल ढळणार याची काळजी घेतली.

१९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातून जनसंघातर्फे उभे राहावे असे ठरल्यावर संपूर्ण मतदारसंघ दणाणून सोडला व प्रचंड संपर्क करत आमदार म्हणून निवडून आले. अल्पावधीतच विधिमंडळाच्या कामकाजाची पद्धत लक्षात घेऊन संविधानक आयुधांच्या कुशलतेने व प्रभावी पणे वापर करत जनसामान्यांचे व जनहिताचे प्रश्न मांडण्याचा धडाका लावत एक जागरूक लोकप्रतिनिधी असा दरारा उत्पन्न केला. लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाचा वार्षिक अहवाल सादर करण्याची पद्धत कै. रामभाऊनी सुरु केली ती आजही अनेकांना मार्गदशक ठरत आहे . १९६२ साली समोर तगडा उमदेवार असल्यानं परिश्रम करूनही पराभव झाला. परंतु हार न मानता १९६७ मधील निवडणूक जिकंली व विधिमंडळात प्रवेश केला.

१९७५ च्या केंद्र शासनाने व निरंकुश सत्ता आपल्या हातात राहावी म्हणून तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली व व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घातली हजारो लोकांना तुरूंगात डांबले. या उभारलेल्या जनआंदोलनात कै रामभाऊ अग्रणी होते. कारागृहात राहूनही त्यांनी लोकप्रतिनिधित्व करत राहिले. यथावकाश जनक्षोभामुळे आणीबाणी उठवली. त्यानंतर झाल्येल्या लोकसभा निवडणुकीत कै रामभाऊ यांनी ठाणे मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केले. अफाट लोकसंग्रह , लोकाभिमुख कार्यशैली ,तत्पर सेवा वृत्ती यामुळे ते मतदाराच्या मनात कायम स्मरत राहिले.

काम, अखंड प्रवास , लोकांची चिंता या सर्वामुळे प्रकृती कडे दुर्लक्ष्य याचा परिणाम म्हणजे १९८१ मध्ये कर्करोगाची बाधा , कार्यमग्नता हेच जीवनाचे सूत्र मानणाऱ्या रामभाऊंनी शेवटच्या श्वासपर्यंत अनॆक कामात गुंतून ठेवले व धडपड सुरूच ठेवली. मन नाही थकले पण शरीर थकले व ६ मार्च १९८४ रोजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अंतिम श्वास घेतला. छत्रपती शिक्षण मंडळाच्या कामामध्ये त्यांनी आस्था व कार्यकर्त्यांशी आपुलकीचे संबंध जोपासलेले होते. त्यांचे स्मरण कायम होत राहावे म्हणून संस्था दरवर्षी कै. रामभाऊ म्हाळगी स्मृतिदिन योजत असते.

या प्रसंगी सर्व शिक्षकांसाठी व समाजातील मान्यवरांसाठी एक व्याख्यान योजत असते