छञपती शिक्षण मंडळाच्या प्राथमिक विभागाचा स्नेहमेळावा साविञीबाई फुले कलामंदिर डोंबिवली येथे  संपन्न झाला.संस्था  22वर्षापासून प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाचा हा उपक्रम आयोजित करते आहे. यामाध्यमातून गीत रामायण, कृष्णरंग,नवरसाच्या हिंदोळ्यावर, महाराष्ट्राची लोकधारा  अस्मिता महाराष्ट्राची, किमया निसर्गाची अशा वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला होला. 


 

यावर्षी अतुल्य भारत या संकल्पनेवर आधारित विविध नृत्यप्रकार मुलांनी सादर केले.या कार्यक्रमासाठी फुलपाखरु मालिकेत काम करणारे आशिष जोशी, व माझ्या नव-याची  बायको मालिकेतील बालकलाकार आर्यन देवगिरी  हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते,तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर जोशी उपस्थित होते.

 



 

आपला देश प्रांतवार भाषा,लोककला संस्कृती, व परंपरेने नटलेला आहे. वैविध्यपूर्ण  असलेल्या लोककलेची नृत्ये सादर करताना उत्तरेकडील हिमाचल प्रदेश ते दक्षिणेकडील  तामिळनाडूचा समावेश केला होता. याद्वारे घंटू, होजागिरी, करकट्टम, पंगी, पंथी कमसाले, बिहू असे अपरिचित प्रकार विद्यार्थ्यानी सादर केले.एकूण 476 विद्यार्थी व100 शिक्षकांनी यात सहभाग घेतला.प्रत्यक्ष वाद्यवृंदासह आधुनिक तंञन्जानाचा वापर ही यावर्षीच्या स्नेहमेळाव्याची वैशिष्ट्ये आहेत.

 

 

या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व 950 पालक उपस्थित होते..या वर्षी  प्रथमच शिक्षकांनी चिरमी हे राजस्थानी लोककला प्रकारातील नृत्य सादर केले. या कार्यक्रमातील सर्व नृत्यांचे दिग्दर्शन ओंकार भागवत यांच्या क्षितीज ग्रुप ने केले. अप्रतिम व अवघड अशी विविध नृत्ये मेहनत घेऊन विद्यार्थ्यांकडून करवून  घेतली