छत्रपती शिक्षण मंडळाच्या श्रीमती राधाबाई साठे विद्यालयात आज शुक्रवार दि 23 मार्च 2018 रोजी केंद्रीय वस्तू व सेवाकर ठाणे ग्रामीण आयुक्तालय यांच्या मार्फत स्वछता गृहाच्या नुतनीकरण चा कार्यक्रम आज सम्पन्न झाला , केंद्रीय वस्तू व सेवाकर ठाणे ग्रामिण आयुक्तालयाचे आयुक्त सन्मानिय श्री धनसेकरन साहेब व त्यांचे सहकारी यांच्या सौजन्याने विद्यालयाच्या स्वछता गृहाचे नूतनी करण्यात आले. भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांच्या एक पाऊल स्वछते कडे स्वच्छ भारत अभियानांतर्गत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री धनसेकरन साहेबानी त्यांच्या मनोगत मध्ये संस्थेच्या “मागेल त्याला शिक्षण “ दिले जाते या ब्रीद वाक्याचे स्पष्टीकरण देत ह्या संस्थेचा तसेच संबंधित शाळांचा खूप अभिमान वाटतो असे म्हटले.
छत्रपती शिक्षण मंडळाचे उपकार्याध्यक्ष तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . श्री खंडागळे सर यांनीही आपल्या अध्यक्षीय मनोगत मधून विद्यार्थांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.