छत्रपती शिक्षण मंडळाच्या श्रीमती राधाबाई साठे शाळा डोंबिवली येथे दिनांक ०९/०३/२०१८ रोजी विज्ञान मेळावा संपन्न झाला. तत्पूर्वी विज्ञान व इंग्रजी या विषयातील शिक्षकांनी आजूबाजूच्या शाळांना भेटी देऊन विद्यार्थयांना विज्ञानामधील प्रयोग व इंग्रजी मधील गमतीजमती विविध खेळांच्या माध्यमातून दाखवून जागृती व उत्सुकता निर्माण केली होती. या कार्यक्रमास दिवा व डोंबिवली परिसरातील शिक्षक व विध्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे विज्ञानाची फिरती प्रयोगशाळा या विषयाचे प्रांत प्रमुख श्री. श्रीरंग पिंपळीकर सर प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. श्री. श्रीरंग पिंपळीकर सर स्वतः अश्या प्रकारची विज्ञानाची फिरती प्रयोगशाळा संपूर्ण प्रांतात ग्रामीण परिसरातील दुर्गम भागात गेली २५ वर्षे चालवतात व आत्ता पर्यंत सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. प्रमुख वक्ता म्हणून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले " २१वे शतक हे विज्ञानाचे आहे, अंधश्रद्धांना थारा न देता विज्ञानाची कास धरून आपण प्रगती करून घ्यावी."
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस श्री. मधुकर फडके व प्रमुख पाहुणे मा. श्री. दत्तात्रय शेंडकर - छत्रपती शिक्षण संस्था - पुणे उपस्थित होते. कार्यक्रमास अन्य मान्यवर श्री. भरत शेंडकर - डोंबिवलीतील व्यवसायिक, शाळा समितीचे सर्व सदस्य आवर्जून उपसत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. मुख्याध्यापक श्री. तळेले यांनी केले.