विवेकानंद संकुल,सानपाडा येथील  ग्रंथालय उदघाटन - 25 feb.2021

    

लुब्रिझॉल इंडिया कंपनीने CMD श्री संजीवजी कौल व संस्था अध्यक्ष डॉ नंदकुमार जोशी 

'वाचनाने मनुष्य प्रगल्भ, सुसंस्कृत होतो.

         गुरुवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी ४.३०   वाजता

विवेकानंद संकुल सानपाडा येथील अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त सुसज्ज अशा ग्रंथालयाचे उदघाटन , लुब्रिझॉल इंडिया कंपनीने CMD श्री संजीवजी कौल व संस्था अध्यक्ष डॉ नंदकुमार जोशी यांच्या हस्ते व संस्थेच्या इतर मान्यवर पदाधिकाऱ्याच्या प्रमुख उपस्थितीत, संकुलातील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या साक्षीने संपन्न झाले.

       लुब्रिझॉल कंपनीच्या आर्थिक सौजन्याने सुसज्ज  असे आधुनिक ग्रंथालय वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी शाळा व समाजासाठी सज्ज आहे.किंडलची सुविधा वाचकांसाठी आहे.विशेष म्हणजे हे ग्रंथालय समाजाभिमुख आहे.शाळेतील शिक्षक, विद्यार्थी ह्याबरोबरच पालक,परिसरातील नागरीक वाचनप्रेमींसाठीही उपलब्ध आहे.

       लुब्रिझॉल इंडिया कंपनीचे C MD संजीवजी कौल,Hr  Director of Lubrizol श्री.नियोगी, श्री,कानसे,छत्रपती शिक्षण मंडळ संस्था अध्यक्ष डॉ.नंदकिशोर जोशी,सरचिटणीस श्री.अनिल पांचाळ,कार्याध्यक्ष श्री.श्रीकांत तरटे, श्री.मनोहर ठाकूर देसाई,श्री.आशुतोष देवधर,

श्री.संजय पालकर,चिटणीस सौ.भारती वेदपाठक,सौ.मीनाक्षी गागरे,

उपस्थित होते.तसेच शालेय समिती सदस्य श्री.ढवळीकर,श्री. आनंद देशमुख, सौ.स्नेहा जोशी उपस्थित होत्या.

    पालक शिक्षक संघ प्रतिनिधी, इयत्ता नववी,दहावी गुणवत्ताधारक विद्यार्थी उपस्थित होते.ह्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

       सर्वप्रथम मा.श्री.संजीव कौल ह्यांच्या हस्ते  शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.तद्नंतर लायब्ररीचे उद्गघाटन करण्यात आले.

      संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते लुब्रिझॉल कंपनी मान्यवरांचे पुष्परोपटे देऊन स्वागत करण्यात आले.मान्यवरांचा परीचय श्री.संजय पालकर (संस्था कार्यकारीणी सदस्य, शालेय समिती अध्यक्ष)ह्यांनी करून दिला.

      संस्था अध्यक्ष मा.डॉ.नंदकिशोर जोशी ह्यांनी संस्था शाळेच्या प्रगतीचा आलेख,उपक्रम, कार्यक्रम सांगितले.

      मा.संजीव कौल व  श्री.नियोगी ह्यांनी

 आपल्या मनोगतात शाळा ,त्यांच्या जीवनातील शिक्षकांचे योगदान,अपयशाकडून यशाकडे जाण्याचा मार्ग,आत्मविश्वास ह्या मुद्यांवर स्वतःच्या प्रभावी शैलीत संवाद साधला.

        कार्यक्रमाचे ऋणनिर्देश मराठी माध्यमिक विभाग मुख्याध्यापक श्री.वाव्हळ सरांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.गीता रावत ह्यांनी केले.