शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.शिक्षण ह्या व्यापक प्रक्रियेतील विद्यार्थी ..प्रत्येक मूल हे आपल्या गतीने वयानुरूप शिकत असते.प्रत्येक मूल हे विशेष असते.Every child is special.सध्याच्या आधुनिकीकरणाच्या काळात दर सेंकदाला नवनवीन ज्ञानाचा स्फोट होत आहे.अशा वेळी पारंपारीक शिक्षण पद्धतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड देणे अत्यावश्यकच आहे.

        शाळेतल्या शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देण्यावाचून गत्यंतरच नाही.अर्थात शिक्षकाची भूमिकाही तितकीच महत्वपूर्ण आहे.अद्यावत माहिती आणि ज्ञान मिळवून देणारा ,विचार करायला लावू शकणारा आणि शिक्षणाची गोडी निर्माण करू शकणारा उत्तम मार्ग म्हणजे नवीन तंत्रज्ञान .

        शिक्षणाच्या ठराविक पद्धतीच्या चाळण्यामधून शेवटी मुलांपर्यत पोहोचणारी माहिती आणि कौशल्ये खूपच मर्यादित असतात.डिजिटल तंत्रज्ञानामुळे अथांग माहितीची आणि ज्ञानाची कवाडे उघडली आहे.वेगवेगळ्या स्त्रोतामधून येणारे ज्ञान मूल आपल्या गतीने आणि आपल्या कलेने शिकू शकतात.शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात तंत्रज्ञान वापरण आवश्यक आहे.

       महात्मा गांधीनी तर आधीच त्यांच्या काळातच कृतियुक्त शिक्षण,स्वाबलंबन ह्यावर भर दिला होता.आता जुन्या पारंपारीक शिक्षणपद्धतीला छेदून कृतियुक्त,कौशल्याधिष्ठीत,ज्ञानरचनावादी,तंत्रस्नेही पद्धतीचा अवलंब केल्यास विद्यार्थी फक्त परीक्षार्थी,घोकंपट्टीचा पोपट न होता आदर्श नागरीक होईल .मिळवलेले ज्ञान व्यवहारात उपयोगी आणेल.

             मेक इन इंडिया,स्टार्ट अप इंडिया ,कौशल्य विकास हे सर्व अंमलात आणण्याचे मूलाधार म्हणजे शिक्षण ....शाळा ! ज्ञान आणि अनुभव यांची सांगड जो घालून देतो तोच खरा शिक्षक.ह्यासाठी शिक्षकांनीही  तंत्रस्नेही होणे गरजेचे आहे किंबहुना बरेच शिक्षक नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या अध्यापनात करतात.एक चित्र हजार शब्दांचे काम करते.हल्ली संगणक ..नेट,यु टयुब,व्हिडीओ कॉन्फरन्स,प्रोजेक्टरचा  वापर ,ई लर्निंगचा वापर होतोय.त्यात ग्रामीण,शहरी असे काही नाही.सर्वत्र ह्या सुविधाचा वापर होतोय.मोबाईलचा उपयोग सहेतुकपणे शिक्षणासाठी सहज करू शकतो.कविता,गाणी,शिक्षणविषयक अनेक संदर्भ डाऊनलोड करून विद्यार्थांना उपलब्ध करून देवू शकतो.

        हल्लीच खाजगी इंग्रजी शाळांतील १५ हजार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये प्रवेश घेतला आहे.त्याला कारणच हेच आहे ---शिक्षणाला नवीन तंत्रज्ञानाची जोड,शिक्षकांची मेहनत,मराठी शाळांमधील गुणवत्ता वाढते आहे..महाराष्ट्रातील सर्वच शाळांनी सरल प्रणाली अंतर्गत विद्यार्थ्यांची माहीती भरली .ट्रान्स्फर रिक्वेस्टने जुन्या नवीन विद्यार्थांची नोंद केली,संचमान्यता फायनलायझ केली.हे सर्व आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून केले.शासनाने दिलेल्या एका लिंकवर सर्व माहिती भरली.महाविद्यालयीन प्रवेश,अनेक शिष्यवृत्ती अर्ज आपण संगणकाचा वापर करून भरतोय.

      शिक्षण तंत्रज्ञानाच्या आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रणेत्या मा.वसुधा कामत ह्यांचे म्हणणे आहे की, Learning is innate.ते शिकवावे लागत नाही.नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना जे पाहिजे ते आणि जसे पाहिजे तसे त्या पद्धतीने शिकण्यासाठी मदत करणे हे शिक्षकांचे काम असते .शिक्षकांना पर्यायच नाही .

      शिक्षणात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणाचा दर्जा वाढविणे क्रमप्राप्तच आहे .शाळा, संस्था ह्यांचे स्वतःचे संकेतस्थळ असते,ज्यामुळे समाजाला शाळा ,संस्थेची माहिती मिळते,उपक्रम,कार्यक्रमाची ,गुणवतेची पोच मिळते.नवीन प्रवेश वाढतात .तंत्रज्ञानामुळे शिक्षणाची गोडी वाढेल,कौशल्य विकसित होतील.सामाजिक संदेश ,त्यांची कार्यवाही  त्वरीत करता येईल.उदा.कचरा व्यवस्थापन,स्त्रीभ्रूणहत्या.......

        शिक्षण पद्धतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळालयास शिक्षणाची गुणवत्ता वाढेल,मराठी शाळासमोरील आव्हाने संपुष्टात येतील.शाळा,शिक्षकांचे भविष्य सुरक्षित होईल.ग्रामीण.शहरी शाळांचा  सांकव समांतरपणे वाटचाल करेल.भावी पिढी बुद्धिवादी..कौशल्यविकसित असेल.फक्त परीक्षार्थी घडणार नाही हे नक्कीच!

  • धरू विज्ञानाची कास,

            आस आम्हा नवीन तंत्रज्ञानाची

            ध्यास गुणवत्तापूर्णे शिक्षणाचा ...!              

                

                                           सौ.ऋतुजा रविंद्र गवस.

                                 प्राथमिक विद्यालय ,विवेकानंद संकुल सानपाडा.

                                        ८६५२४३३२२३