विवेकानंद संकुल सानपाडा शाळेची स्थापना ३ जुलै १९९५ साली झाली. इंग्रजी , मराठी माध्यम सकाळ , दुपार सत्रात भरते.शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे.त्यात संस्था पदाधिकारी,मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी ,पालकवर्ग आणि समाजाचाही महत्वपूर्ण वाटा आहे.
विद्यार्थांना ज्ञानरचनावाद , कृतीयुक्त अध्ययन अध्यापन ,Activity based science learning ,कौशल्य विकसित होणे गरजेचेच आहे. MAKE IN INDIA ,DIGITAL LEARNING, मिळवलेले ज्ञान स्वतः पडताळले ,हाताळले पहिजे.म्हणूनच विद्यार्थ्यासाठी ..शाळेसाठी ग्लोबप(Glob op) तसेच सेवा सहयोग आणि आपल्या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण ह्यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद संकुल सानपाडा शाळा येथे सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारण्यात आली आणि ह्या प्रयोगशाळेचे उद्घाटन काल दिनांक २२ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी झाले.
छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.नंदकिशोर जोशी सर,सरचिटणीस मा.श्री.मधुकर फडके,कार्याध्यक्ष प्राचार्य फडके सर उपस्थित होते. तसेच संस्था सदस्य ,सानपाडा शालेय समिती सदस्य मा.श्री.फाटक सर ,श्री.ढवळीकर सर (शालेय समिती सदस्य,चेंबूर एज्युकेशन सोसायटी सरचिटणीस) उपस्थित होते.
ग्लोबप (Glob op) संस्थेचे डायरेक्टर मा.श्री.पियुष चौधरी , ASSOCIATE DIRECTOR श्रीमती .सोनाली दोषी ,अरेना सूर (HR) उपस्थित होते.सेवा सहयोग संस्थेचे डायरेक्टर मा.श्री,किशोर मोघे सर,इनरव्हील क्लब सदस्य श्रीमती.तस्लीम ,फायझर कंपनीचे शेणोय सर उपस्थित होते.
उद्घाटन सोहळयाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य फडके सरांनी केले.सरांनी संस्थेची वाटचाल थोडक्यात सांगितली.सेवा सहयोग,ग्लोबप संस्थेचे आभार मानले.
श्री.पियुष चौधरी ( Glob op) संस्थेचे डायरेक्टर त्यांनीही मार्गदर्शनपर भाषण केले.विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेचा सदुपयोग करावा.सर्व साहित्य काळजीपूर्वक हाताळून प्रयोग निष्कर्ष पडताळून पाहावेत असे आव्हान केले.
श्री.किशोर मोघे (सेवा सहयोग डायरेक्टर ) ह्यांनी विज्ञान,तंत्रज्ञान ह्याची शिक्षणाला जोड आवश्यकच आहे.विद्यार्थांनी प्रयोगशाळेचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा असे सांगितले. सन्माननीय मान्यवरांनी उद्घाटन केल्यानंतर विद्यार्थी,शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनीही प्रयोगशाळेला भेट दिली.
शाळा हा समाजाचा आरसा आहे.सहयोगातून सेवा जपतच शाळा आणि समाज ह्यांच्या एकत्रित सहकार्याने आज विवेकानंद संकुल सानपाडा शाळेत प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले.
धन्यवाद !
सौ.ऋतुजा रविंद्र गवस.
विवेकानंद संकुल सानपाडा.