सौ. टिळक गीतांजली गजानन श्रीमती. भावे विनया विजय
मुंबई राज्याचे १ मे १९६० रोजी विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात हि राज्य अस्तित्वात आली. या काळात राजकीय लढा व चळवळ यावरच सर्व लक्ष केंद्रित झाले होते. कल्याणमध्येही या आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांच्या डोळ्यासमोर अशिक्षित समाज होता. म्हणून ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, त्याच दिवशी त्याच मुहूर्तावर म्हणजे १ मे १९६० रोजी छत्रपती शिक्षण मंडळ स्थापन झाले व जून १९६० मध्ये पहिली शाळा अभिनव विद्यामंदिर सुरु झाली. इ ५ वी ते ८ वी मध्ये एकूण १३८ विध्यार्थ्यानी प्रवेश घेतला. कल्याणमधील ज्या विध्यार्थ्यानी प्रस्थापित शाळा प्रवेश देण्यास फारशा उत्सुक नसत , असे विद्यार्थी प्रविष्ट झाले.
अभिनव विद्यामंदिर भाड्याच्या जागेतून स्वतःच्या वस्तुत प्रवेश करीत असतानाच १९६१ च्या जून मध्ये नूतन विद्यालय मुरबाड रोडला सुरु झाले. त्यानंतर पुढील वर्षी १९६२ मध्ये कल्याण पूर्व मध्ये म्हणजे कोळसेवाडीत ज्ञान मंदिर व मांडा – टीटवाळा येथे विद्यामंदिर सुरु झाले. १९६३ मध्ये मुरबाड तालुक्यात धसई येथे जनता विद्यालयात प्रारंभ झाला. तर १९६४ मध्ये विक्रमगड हायस्कूलच्या संचालनाची जबाबदारी छत्रपती शिक्षण मंडळाने स्वीकारले. संस्थेचे ब्रिद मागेल त्याला शिक्षण असे असलेल्यांची संस्थेने जेथे जेथे शिक्षणाची गरज होती. तेथे तेथे पाऊल टाकून शिक्षणापासून वंचित असलेल्यांची शैक्षणिक गरज पूर्ण करण्याच्या प्रयत्नास लागली. पहिल्या चारच वर्षात संस्थेने ६ माध्यमिक विद्यालये विविध भागात सुरु केली. शिक्षणापासून दूर असलेल्या समाजातील मुले आपल्या शाळांमुळे शैक्षणिक प्रवाहात आली. त्याकाळी माध्यमिक शिक्षणाची सोय सर्वत्र नव्हती .
विक्रमगड हायस्कूल हे दुर्गम व वनवासी भागात असल्याने तेथील वनवासी , आदीवासी विद्यार्थ्याच्या आयुष्यात शैक्षणिक पाहत उगवली. संस्थेने आपल्या ब्रीदाला साजसे कार्य पहिल्या चार वर्षातच सुरु केले.